राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक हल्ला प्रकरण, शिवसेना नगरसेवकांना अटक!

राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक हल्ला प्रकरण, शिवसेना नगरसेवकांना अटक!

नवी मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्यावर हल्ला आणि गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना नगरसेवक एम के मढवी , करण मढवी यांना रबाले पोलीसांनी अटक केली आहे. दोघेही ऐरोलीत शिवसेनेचे नगरसेवक आहेत.

दरम्यान पालिकेच्या सभागृह उद्घाटन प्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती, यावेळी संदीप नाईक यांच्यावर आणि गाडीवर हल्ला झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी हा हल्ला केला होता. त्यामुळे शिवसेना नगरसेवक एम के मढवी, करण मढवी यांना रबाले पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS