शिवसेनेला धक्का, कोकणातील ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा, राष्ट्रवादीत जाणार?

शिवसेनेला धक्का, कोकणातील ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा, राष्ट्रवादीत जाणार?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेला रामराम करत सहदेव बेटकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सहदेव बेटकर गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने सहदेव बेटकर नाराज होते. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले असून भास्कर जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे रत्नागिरीत आघाडीला मोठा धक्का बसला होता. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीनच शिवसेना-भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. कारण गुहागरमधील शिवसेनेचे नेते सहदेव बेटकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत.

भाजपच्या वाटेवर असलेले भारत भालके राष्ट्रवादीत

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेले पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके हे आता राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. आमदार भारत भालके यांचा मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित प्रवेश होणार आहे. भारत भालके 3 ऑक्टोबरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भारत भालके हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये जातील असंही बोललं जात होतं. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखतीलाही अनुपस्थिती लावली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS