नाशिक – शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून नाशिकमधील शिवसेनेच्या 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडल्याने नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदेंच्या पाठीशी बळ उभे देण्यासाठी या सर्व पदाधिकाय्रांनी राजीनामा दिला आहे.
प्रविण तिदमे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, हर्षा बडगुजर, कल्पना पांडे, हर्षदा गायकर, किरण गामने, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, नयन गांगुर्डे, राधा बेंडकुळे, रत्नमाला राणे, सीमा निगळ, संतोष गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे याठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडण्याची जोरदार मागणी होती. परंतु नाशिक पश्चिममध्ये भाजपाच्या सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून विलास शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विलास शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे
COMMENTS