शिवसेनेला जोरदार धक्का, ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

शिवसेनेला जोरदार धक्का, ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपला अहमदनगरमध्ये हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान शिवसेनेनं भाजपसोबत युती केल्यामुळे घनश्याम शेलार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. कार्यकर्ते स्वबळावर लढण्याच्या मनस्थितीत असतानाच भाजपाने शिवसेनेशी चर्चा सुरु केली आणि अखेर दोन्ही पक्षांची निवडणुकीच्या तोंडावर युती झाली. युतीच्या निर्णयामुळे कार्यकर्ते निराश झाले असून या निर्णयामुळेच आपण शिवसेनेतून बाहेर पडत असल्याची माहिती घनश्याम शेलार यांनी दिली आहे.

COMMENTS