सिंधुदुर्ग – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आतापासूनच फोडाफोडीचे राजकारण सुरु झालं असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. बबन साळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. येत्या काही दिवसातच बबन साळगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान साळगावकर यांनी तीन वेळा सावंतवाडीचं नगराध्यक्षपद भूषवलं आहे. दीपक केसरकर यांचे ते खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता असून त्यांच्या पक्षप्रवेशासाठी खुद्द शरद पवार हे सावंतवाडीत जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साळगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS