मुंबई – गोवा लोकसभा निवडणुकही स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गोवा लोकसभेतील दोन्हीही जागा शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एनडीएतील भाजप विरोधात बंडखोरीचं शिवसेनेचं हे पहिलं पाऊल असल्याचं दिसत आहे.
दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचशी शिवसेनेनं युती केली होती. या युतीत 3 जागा लढवण्यात आल्या होता. या तिन्ही ठिकाणी जेमतेम 500 ते 1000च्या आसपास मतं मिळाली होती. गोवा सुरक्षा मंचशी असलेल्या युतीबाबत राऊत यांनी वक्तव्य केलं आहे. लोकसभेसाठी गोवा सुरक्षा मंचचा आम्हाला पाठिंबा असून ते विधानसभा आमच्या पाठिंब्यावर लढणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS