आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक !

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यात आणि देशात बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. आज भाजपची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. तर राष्ट्रवादीच्याही काही ठिकाणी बैठका घेण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव आज कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे. २०१९च्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणी आणि रणनितीसाठी शिवसेना भवनात ही बैठक पार पडली आहे.

दरम्यान या बैठकीत मुंबई शहरातील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधीकारी खासदार, आमदार आणि नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आहे. तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

COMMENTS