मुंबई – पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शक्तीप्रदर्शनाची गाडी सुसाट चालू असल्याचं दिसत आहे. मिलिंद नार्वेकर यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारं होर्डिंग ‘प्रतिक्षा’च्या बाहेर लागलं आहे. अमिताभ यांचा उद्या वाढदिवस त्यानिमित्त नार्वेकर यांनी मराठी भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत.
होर्डिंगवर बाळासाहेब-अमिताभ यांच्यातील स्नेहसंबंधाचा एक क्षण छायाचित्र रुपात लावण्यात आला आहे. अमिताभ यांनी ‘दीवार’ चित्रपटात साकारलेली व्यक्तिरेखाही होर्डिंगवर आहे. अमिताभ यांना पहिल्यांदाच शिवसेनेनं सार्वजनिकरित्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीचं होर्डिंग्जच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यामुळे सध्या नार्वेकर यांची शक्तीप्रदर्शनाची गाडी सुसाट सुरु असल्याचं दिसत आहे.
COMMENTS