…तर युती होणार नाही, शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेंचं खळबळजनक वक्तव्य!

…तर युती होणार नाही, शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेंचं खळबळजनक वक्तव्य!

सांगली – शिवसेना -भाजपची युती होणार असल्याची चर्चा असतानाच शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केलं आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे. सांगलीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.सागंलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

दरम्यान शिवसेना-भाजपचं जागावाटपाचं गणित जुळलं असून युतीची घोषणा 29 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेला करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतु शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून आम्ही यावेळी आमचं सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिवाकर रावते यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS