मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली असून या बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार असून मातोश्रीवर शिवसेनेचे मंत्री दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलण्यात आली असल्याची चर्चा आहे. तसेच जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतशी शिवसेना आणि भाजपमधील दुरी कमी होत चालली असल्याचं दिसत आहे. कारण आज वाशिममधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं असल्याचं पहवायास मिळालं आहे. त्यामुळे या बैठकीत शिवसेना-भाजपच्या युतीबाबतही चर्चा केली जाते का? याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
COMMENTS