आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा !

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा !

मुंबई – राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अखेर सोमवारी रात्री उशीरा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा अजून स्विकारलेला नाही. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. दीपक सावंत यांना थांबायला सांगितले आहे. तसंच सांवत हे मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे तिकीट डॉ. दीपक सावंत यांना नाकारले आहे. त्यांच्याऐवजी विलास पोतनिस यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे नाराज डॉ. सावंत यांनी राजीनामा दिला आहे. आमदार नसले तरी सहा महिने मंत्रीपदावर राहता येतं. त्यामळे आता सावंत यांचा राजीनामा स्विकारला जाणार की त्यांना आणखी सहा महिने मंत्रीपदावर राहण्याची संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS