मुंबई – कोणत्याही पक्षानं बहुमत सिद्ध न केल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा अजूनही सुरु आहे. 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनोच्या आमदारांना पुन्हा एकत्र ठेवण्याचे शिवसेनेचे नियोजन आहे. शिवसेना आमदारांना 17 नोव्हेंबरपासून पुन्हा एकत्रित ठेवले जाणार आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन असून यादिवशी मुंबईत येताना काही दिवस राहण्याच्या तयारीनिशी येण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती आहे.
दरम्यान 5 दिवसानंतर मालाडच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांना ठेवले होते. या सर्व आमदारांना काल रात्री घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. परंतु 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनोच्या आमदारांना पुन्हा एकत्र ठेवण्याचे शिवसेनेचे नियोजन आहे. यावेळी आमदारांना मुंबईबाहेरील हॉटेलमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS