भाजप प्रवेशासाठी आपल्याला 5 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. पक्षात आल्यास या पैशांसोबत निवडणुकीचा खर्चही देऊ असंही आश्वासन दिल्याचं दावा जाधव यांनी केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्याला ही ऑफर दिली असा दावाही हर्षवर्धन जाधव यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिली असंही जाधव म्हणाले. पैसे, पोटनिवडणुकीचा खर्च आणि निवडूण आले नाहीत तर विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. माझ्याशिवाय इतर 25 आमदारांना अशीच ऑफर दिल्याचा दावाही हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
COMMENTS