शरद पवारांच्या पूरग्रस्त भागातील दौय्रात शिवसेना आमदार, सरकारच्या उपाययोजनांबाबत दर्शवली नाराजी !

शरद पवारांच्या पूरग्रस्त भागातील दौय्रात शिवसेना आमदार, सरकारच्या उपाययोजनांबाबत दर्शवली नाराजी !

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पवारांच्या या दौय्रादरम्यान करवीरचे स्थानिक शिवसेना आमदार चंद्रदिप नरके हे सामील झाले होते. यावेळी नरके यांनी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी दर्शवली असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी नरके यांनी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमधील पूरग्रस्त छावणीत पवारांनी ध्वजारोहण केलं. यावेळी पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. ध्वजारोहणानंतर पूरग्रस्त महिलांनी शरद पवारांना राखी बांधली. यावेळी पूरग्रस्तांची संवाद साधताना पवारांनी या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाई मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील असा विश्वास दिला. याचदरम्यान शिवसेना आमदार चंद्रदिप नरके यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी दर्शवली असल्याची माहिती आहे.

तसेच नरके यांच्या भेटीबाबत हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून चंद्रदिप नरके सत्तेत असल्यानं जास्त बोलत नाहीयत. ते स्वत:च मला अधिकाधिक बोटी पाठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगा म्हणून कॉल करत होते असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS