मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुद्द्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान अधिवेशनात पक्षाची छाप पडेल असे मुद्दे उपस्थित करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकर्यांचे न सुटलेले प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडा तसेच कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहचला नसेल तर त्याबाबत आवाज उठवण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती आहे.
दरम्यान निवडणुकीत दिलेल्या आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांबाबत आवाज उठवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे आता शिवसेनेचे आमदारही या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचं दिसत आहे. सभागृहामध्ये विरोधकांचा सुरु असलेला वाढता गोंधळ आणि आता मित्रपक्षे असलेले शिवसेनेचे आमदारही सरकारच्या विरोधात उभे ठाकणार असल्यामुळे यावर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलच गाजणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS