कोकणात शिवसेना- राष्ट्रवादीत संघर्ष, सुनील तटकरेंविरोधात शिवसेना आमदाराचा हक्कभंग प्रस्ताव !

कोकणात शिवसेना- राष्ट्रवादीत संघर्ष, सुनील तटकरेंविरोधात शिवसेना आमदाराचा हक्कभंग प्रस्ताव !

मुंबई – राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नाही. कारण नेहमी कोणत्या ना कोणत्या नेत्यामध्ये धूसपूस पहायला मिळते. आता कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला असल्याचं दिसत आहे. कारण
दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

सुनिल तटकरे हे दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्याविरोधात २० ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोकणात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. विशेष खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे.

दरम्यान मंडणगड तालुक्यातील पुलासाठी तटकरेंसोबत आपणही प्रयत्न केले होते. परंतु कार्यारंभ आदेश येण्याआधीच यांनी भूमिपूजन उरकलं. स्थानिक आमदार असूनही आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही किंवा भूमिपूजनाच्या फलकावर नावही टाकलं नसल्याता आरोप योगेश कदम यांनी केला आहे.

COMMENTS