मुंबई – प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरुन आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला होता. जवानांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज विधानसभेत गोंधळ घातला होता.
दरम्यान यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहाबाहेर येऊन परिचारकांविरोधात फलक दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच प्रशांत परिचारक यांना निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा. त्यांनी देशातील सैनिकांच्या पत्नींचा अपमान केला आहे. जवानांचा अपमान करणाऱ्या परिचारकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं शिवेसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. तरआमदार प्रशांत परिचारिक यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीने एकमताने घेतला होता. या समितीमध्ये शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हेही होत्या. निलंबन मागे घेण्याचा ठराव विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाला आहे. हा विधानपरिषदेतील विषय आहे तो विधानसभेत आणण्याची गरज नाही. एकदा ठराव मंजूर झाला की तो परत वर्षभर आणता येत नाही, त्यामुळे निलंबन मागे घेता येणं शक्य नसल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
COMMENTS