त्यामुळे आम्ही बॅनर फाडला, हाणामारीनंतर शिवसेना आमदाराचं वक्तव्य!

त्यामुळे आम्ही बॅनर फाडला, हाणामारीनंतर शिवसेना आमदाराचं वक्तव्य!

नागपूर – विधानसभा सभागृहात आज शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात हाणामामारी झाली. कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ घातला. आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. अधिवेशन केवळ पाच दिवसच चालणार आहे. चर्चा करण्यापेक्षा विरोधक वेलमध्ये आले. गृहमंत्री जयंत पाटील हे अध्यक्षांना वारंवार विनंती करुन, सुरक्षा देण्याची मागणी करत होते. मात्र विरोधक मंत्र्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होते. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या समोर बॅनर घेऊन घोषणाबाजी करत होते. त्यामुळे आम्ही बॅनर फाडला असल्याचं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

दरम्यान दरम्यान या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही पक्षातील आमदारांना हे वर्तन ठिक नसल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षातील आमदारांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु असं एकमेकांच्या आंगावर जाण योग्य नाही. तसेच अशाप्रकारचं वर्तन दुसय्रांदा होऊ नये अन्यथा त्या आमदारांवर कारवाई केली जाईल असंही पटोले म्हणाले आहेत.

COMMENTS