चंद्रपूर – डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. धानोरकर यांना येत्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान धानोरकर हे सेना नेतृत्वावर नाराज असून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युतीच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केले होते. धानोरकर हे पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते वरोरा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले.चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहीर यांचे विरोधक म्हणून ते ओळखले जातात.
COMMENTS