मला शिवसेनेचे आमदार शून्य करायचे आहेत – नारायण राणे

मला शिवसेनेचे आमदार शून्य करायचे आहेत – नारायण राणे

कोल्हापूर – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण  राणे यांनी आज पक्ष स्थापनेनंतरचा पहिला राजकीय दौरा सुरू केला आहे. पहिल्याच दौ-यात त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे 10 पैकी 6 आमदार आहेत. ते मला शून्य करायचे आहेत या शब्दात त्यांनी शिवेसनेला डिवचलं आहे. याचा अर्थ ते आमदार निवडूण येणार नाहीत असं नाही तर इतर पक्षातून त्यांना जिंकवून दाखवू अशा शब्दात शिवसेनेवर प्रहार केला.

नारायण राणे यांची जाहीर सभा उद्या कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. त्याच्या आधी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेला लक्ष केलं. राणे यांनी आज सकाळी महालक्ष्मीचं सर्व कुटुंबियांसह दर्शन घेतलं. राणे ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत. त्या ठिकणी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसे खासदार धनंजय महाडिक यांनी राणे यांची भेट घेतली. मात्र दोन्ही नेत्यांनी त्यानंतर भेटीचा राजकीय अर्थ काढू नका आमची खाजगी भेट होती असंही सांगितलं. राणे उद्याच्या जाहीर सभेत काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS