राणेंना मराठ्यांचा नेता होऊ देऊ नका, तर शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतायत –शिवसेना आमदार

राणेंना मराठ्यांचा नेता होऊ देऊ नका, तर शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतायत –शिवसेना आमदार

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेच्या आमदारांची आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि नारायण राणे यांच्याबाबत संताप व्यक्त केला असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकट्या नारायण राणेंनाच का भेटत आहेत? राणेंना मराठ्यांच्या नेता होऊ देऊ नका. तसेच शरद पवारांची भूमिका संशयास्पद असून ते आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवली आहे.

दरम्यान शिवसेनेच्या बैठकीनंतर राज्यातील शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यावेळी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच विधीमंडळात कायदा बनवून तो संसदेत पाठवण्याची मागणीही यावेळी केली असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS