मुंबई – आमदारांमधून निवडूण दयायच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडूण येऊ शकतात. शिवसेनेत एक तिकीट जवळपास निश्चित आहे. विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांचं नाव निश्चित समजलं जातंय. ते सध्या विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते आहेत. तसंच त्यांची कामगिरीही उत्तम आहे. त्यामुळे त्यांचं नाव निश्चित समजलं जातंय. येत्या 11 जुलैला हे मतदान होणार आहे.
दुस-या जागेसाठी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव मिलींद नार्वेकर इच्छुक असल्याचं बोललं जातंय. मात्र पक्षातूनच त्यांन विरोध होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षातील कार्यशैलीवरुन शिवसेनेत जोरदार वाद झाले होते. त्यामुळे आता पक्षप्रमुख काय निर्णय घेतात ते पहावं लागेल. पक्षातला विरोध डावलून नार्वेकरांच्या गळ्यात आमदारकीची माळ घालतात की इतरांना संधी देतात ते पहावं लागेल.
COMMENTS