आनंदराव अडसूळांनी मागितली शरद पवारांकडे मदत !

आनंदराव अडसूळांनी मागितली शरद पवारांकडे मदत !

मुंबई   शिवसेना खासदार आणि सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँक आणि सारस्वत बँकेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्यामुळे यासंदर्भात अडसूळ यांनी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. जवळपास एक तास अडसूळ, गौतम ठाकूर आणि पवारांमध्ये चर्चा झाली असून त्यांनी पवारांकडे मदत मागितली आहे.

या भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून हजारो खातेदारांना दिलासा देण्यासाठी शरद पवारांकडे मदतीसाठी आल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेऊन पवार मदतीसाठी कायम धावून येत असल्याचेही अडसूळ यांनी म्हटले आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने टाच आणली आहे. ठेवीदारांना पुढच्या सहा महिन्यात 1 हजारापेक्षा जास्तीची रक्कम काढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या विलिनीकरणानंतर ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

COMMENTS