मुंबई – पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून लोकांनी मला निवडून दिलंय त्यामुळे साहेब मला बोलू द्या असं वक्तव्य शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केलं आहे. ओमराजे यांनी अर्थसंकल्पावर मराठीत दणक्यात भाषण करत मराठवाड्यातल्या दुष्काळावर सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. परंतप अध्यक्ष जेव्हा त्यांना भाषण आवरतं घेण्यासाठी सांगू लागले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून लोकांनी मला निवडून दिलंय त्यामुळं मला माझं मत मांडू द्या अशी विनंती त्यांनी सभागृहात केली. ओमराजे यांची ही लोकसभेतली पहिलीच टर्म असून त्यांचं ह् भाषण चांगलच गाजत आहे.
दरम्यान मराठवाड्यावर कायम अन्याय झालाय. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी दिलं नाही. आम्हाला आमच्या हक्काचं 21 टक्के पाणी पाहिजे आहे. दुष्काळामुळे मराठवाड्याची रया गेली आहे. लोकांना कामासाठी दुसरीकडे स्थलांतर करावं लागत आहे. शेती परवडत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मराठवाड्यासाठी जास्तीचा निधी देत मदत करण्याची मागणीही ओमराजे निंबाळकर
यांनी केली आहे. तसेच मोदींनी आश्वासन दिल्यामुळे ते नक्कीच आपला शब्द पूर्ण करतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS