मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची कानउघडणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करा. युती न झाल्यास निवडून न येण्याची धास्ती शिवसेनेच्या काही खासदारांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून युतीसाठी मोर्चेबांधणीही या खासदारांनी सुरु केली होती. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी या खासदारांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी या खासदारांची कानउघडनी केली असल्याची माहिती आहे.
दरम्यान ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी निवडणूक लढवू नये, असे स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर यावेळी पाच खासदारांनी युती केली नाही तर निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती आहे. तसेच युतीची शक्यता मावळल्याचेही संकेत या बैठकीत देण्यात आले.
शिवसेसेनं अनेकवेळा सामना या मुखपत्रातून आणि सभांमधून भाजपवर जोरदार टीका केली आहे. राफेल करार, शेतकरी कर्जमाफीवरही टीका केली जात आहे. यामुळे आधीच भाजपसोबत तणावाचे वातावरण आहे. अशातच युती न झाल्यास निवडून न येण्याची धास्ती शिवसेनेच्या काही खासदारांनी घेतली आहे. त्यामुळे आता याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS