मुंबई – शिवसेनच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळवार लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.
शिवसेनना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातील राजकीय ठराव मांडला. त्यांना सर्व सदस्यांनी अनुमोदन देत कार्यकारणीने एकमताने ठराव मंजुर केला. हिंदुत्वाच्या मुद्यावर गेली 25 वर्ष भाजपसोबत युती होती. युती टिकावी म्हणून शिवसेनेने अनेकवेळा प्रयत्न केले. मात्र गेली तीन वर्ष भाजपने शिवसेनेचे खच्ची करण करण्याचा प्रय़त्न केला असंही त्या राजकीय ठरावात म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवढणूक स्वबळावर लढवून राज्यात 25 खासदार निवडणू आणण्याचे मिशन शिवसेनेने ठेवले आहे. तसेच विधानसभाही स्वबळावर निवडणून आणून स्बवळावर बहुमत मिळवण्याचं टार्गेट शिवसेनेनं स्वतःहा पुढे ठेवले आहे.
COMMENTS