नवी दिल्ली – हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस होता. अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच गाजला असल्याचं पहावयास मिळाले.युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी राज्यातील ओला दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नावरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. तसेच शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते असंही राणा म्हणाल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला आहे, राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो शिवसेनेचा आहे. जर शेतकऱ्यांवर इतकं प्रेम आणि सहानूभुती आहे तर मग तिथे सरकार स्थापन करायचं होतं. शिवसेनेने स्वत:चा स्वार्थ आणि घराचा विचार केला असल्याचंही राणा यांनी म्हटलं आहे.
COMMENTS