मुंबई – दुध दरवाढीबाबत सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आता काँग्रेस, शिवसेना आणि एनसीपीनं पाठिंबा दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये असताना स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानं आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी विधानसभेत पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान राजू शेट्टी यांची भूमिका उचित असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही पण संवेदनशील आहोत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच दुधाची नासाडी होऊ नये हे समजू शकतो ,पण भाव मिळत नसेल तर शेतक-यांनी करावं काय असा सवाल देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. या तिन्ही पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र होणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS