मनसेतून आलेल्या नगरसेवकांची शिवसेनेकडून बढती !

मनसेतून आलेल्या नगरसेवकांची शिवसेनेकडून बढती !

मुंबई – मनसेतून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांना शिवसेनेनं मोठी संधी दिली आहे. या नगसेवकांची बढती केली असून  शिवसेनेच्या अनुभवी नगरसेवकांना स्थायी समितीतून डच्चू दिल्यानंतर त्यांच्याजागी मनसेतून आलेल्या नगसेवकांची वर्णी लागली आहे. आशिष चेंबुरकर आणि मंगेश सातमकरांच्या जागी स्थायी समितीत नवे चेहरे घेण्यात आले आहेत. मनसेतून शिवसेनेत आलेल्या परमेश्वर कदम यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. तर दुस-या जागी शिवसेनेच्याच मिलिंद वैद्य यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती आहे.

तसेच महापालिकेतील इतर वैधानिक समित्यांमधील रिक्त जागांवरही नव्यानं नेमणुका करण्यात आल्या आहेत. स्थापत्य शहर समिती सदस्यपदी किशोरी पेडणेकर, आरोग्य समितीवर सदानंद परब आणि विधी समितीवर हर्षद कारकर यांना संधी देण्यात आली आहे.

 

 

COMMENTS