मुंबई – काँग्रेससह विरोधी पक्षांनी उद्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. हा बंद सरकार किंवा भाजपा विरोधी बंद नाही. महागाईच्या आगडोंबाविरोधात हा बंद आहे, पण जनता आधीच जागरूक झाली आहे. फक्त विरोधी पक्ष आता जागा झाला आहे. शिवसेना या विरोधात आधीपासून आंदोलन करत आहे. त्यामुळे शिवसेना बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. विरोधी पक्षांना त्यांची जबाबदारी समजली पाहिजे विरोधी पक्षाच ओझं चार वर्षा पासून शिवसेने उचललं आहे असंही राऊत म्हणाले.
दरम्यान उद्याच्या बंदमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह अनेक लहानमोठे पक्ष सहभागी होणार आहेत. मनसेनं तर केवळ पाठिंबा नाही तर सक्रीय सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. संभाजी ब्रिगेडही उद्याच्या संपामध्ये सहभागी होणार आहे.
COMMENTS