… तर धनगर समाजाला आरक्षण मिळाले असते – शिवसेना

… तर धनगर समाजाला आरक्षण मिळाले असते – शिवसेना

नागपूर –  धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आज विधानपरिषदेत विरोधी पक्षातील आमदारांनी गदारोळ केला होता. यावेळी शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केलं होतं. जर आज गोपीनाथ मुंडे असते तर धनगर समाजाला आरक्षण मिळाले असते असं मत व्यक्त करत शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेद्वारे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्षांनी उपस्थित केला. यावरील चर्चेदरम्यान आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचा आरक्षणला विरोध आहे. त्यामुळे त्यांचे उत्तर नको धनगर समाज आरक्षण चर्चेवर मुख्यमंत्री यांनीच उत्तर दिले पाहिजे. अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

COMMENTS