मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंना भाजपकडून मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून राणेंना दिलेल्या या ऑफरवर शिवसेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं समजतय. आधी नारायण राणेंना ऑफर स्वीकारू द्यात, मग काय ते पाहू अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना राज्यसभेवर संधी देताच शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
दरम्यान शिवसेनेतून राणेंच्या राजकीय भवितव्याबाबत खाजगीत मत मांडण्यात आलं असल्याची माहिती असून राणेंना राज्य मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध आहे. तसेच एनडीएमध्ये शिवसेना भाजपचा जुना मित्र पक्ष आहे. पण स्वबळाची घोषणा केल्यानंतर भाजपप्रणीत एनडीएला शिवसेनेनं शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे भाजपने राणेंचं राज्यसभेत पुनर्वसन केल्यास शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS