नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीवर शिवसेनेचा आक्षेप, शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने !

नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीवर शिवसेनेचा आक्षेप, शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने !

मुंबई – नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत शिवसेनेनं विरोध केला होता. शिवसेनेचा हा वाढता विरोध पाहता भाजपनं राणेंना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून देण्यात आलेल्या नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीबद्दल शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेकडून राणेंच्या उमेवारीवरून काही प्रश्न विचारले आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने येणार असल्याचं दिसत आहे.

शिवसेनेचे भाजपला प्रश्न

राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार ?
राणेंनी ते अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे का ?
भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची पावती राणे यांच्याकडे आहे का ?
राणे यांना सदस्यत्व दिले नसेल तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी कशी दिली ?
हे प्रश्न शिवसेना विधान परिषद गटनेते अनिल परब यांनी विचारले आहेत. त्यामुळे आता नारायण राणेंना राज्यसभेतही पाठवण्याला शिवेसनेनं विरोध दर्शवला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान नाराण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राणे नाराज झाले होते. राज्यसभेवर जाण्याचा भाजपचा प्रस्तावही त्यांनी फेटाळला होता. परंतु त्यानंतर राणे कसेबसे राज्यसभेवर जाण्यास तयार झाले होते. परंतु आता पुन्हा शिवसेनेनं त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता भाजपला आणि नारायण राणे यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS