मुंबई – अहमदनगरमधील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अहमदनगर प्रकरणावरुन शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची ही मागणी मुख्यमंत्री मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान केडगावमध्ये झालेल्या हिंसाचारात हत्याकांडानंतर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे तोडफोडीप्रकरणी आतापर्यंत ६०० शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आरोपींना फाशी देण्याची मागणी पीडित ठुबे कुटुंबीयांनी केली आहे. तसेच नगरमध्ये आजही तमापूर्ण वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
COMMENTS