मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातील अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. शिवसेनेनं देखील या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. मात्र हे चिन्ह घेण्यास शिवसेनेनं नकार दिला आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आम्हाला बिस्कीट रे चिन्ह नको असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान बिहारमधील सत्ताधारी असलेल्या नितीशकुमार यांच्या जनता दल या पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतला आहे. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला देऊ नये असं जेडीयूनं म्हटलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय लढावं लागणार आहे.
जेडीयूच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाला शिवसेनेने तीन पर्याय दिले होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने केली होती. परंतु निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे
निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या उत्तराची शिवसेनेला आता प्रतीक्षा आहे.
COMMENTS