मुंबई – पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केलं. भारताने केलेल्या या कारवाईनंतर देशभरातून हवाई दलाचं कौतुक केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. आपण घरात घुसून मारलं आहे. आपल्या सैन्याचा खूप अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली असंल्याचं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. यापूर्वी शिवसेनेकडून नेहमीच भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ले केले की पंतप्रधान मोदी यांच्या ५६ इंची छातीचा उल्लेख करून उपरोधिक टीका केली जात होती. परंतु आता युती झाल्यानंतर शिवसेनेनं पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS