यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, शिवसेनेच्या मंत्र्याची घोषणा !

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, शिवसेनेच्या मंत्र्याची घोषणा !

मुंबई – शिवसेनेत मंत्रीपदावरुन सध्या अंतर्गत वाद जोरात सुरू आहे. विधान परिदेतील नेत्यांनाच मंत्रिपदे दिल्यामुळे विधानसभेतील आणि ग्रामिण भागातील शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे विधानसभा, विधान परिषद किंवा इतर कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा रामदास कदम यांनी केली आहे. त्यामुळे यापुढे मी मंत्रीही असणार नाही. संपूर्णपणे पक्षाचं काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. झी 24 तासच्या मुक्तचर्चा या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

               त्यामुळे रामदास कदम दापोलीतून लढणार की मुंबईतील एखाद्या मतदारसंघातून लढणार याविषयीच्या चर्चेला विराम मिळाला आहे. दापोली मतदारसंघातून रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. रामदास कदम यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता योगेश कदम यांचं दापोलीतून तिकीट निश्चित मानलं जातंय. मात्र माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचा योगेश यांच्या तिकीटाला जोरदार विरोध असल्याचं बोललं जातंय.

COMMENTS