…त्यांना उध्दव ठाकरे सोडणार नाहीत

…त्यांना उध्दव ठाकरे सोडणार नाहीत

मुंबई – टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. ते दोन आठवड्यानंतर वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

“पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS