उत्तर प्रदेशाच्या राजकारणात शिवसेनेची एंन्ट्री, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन, पहा व्हिडिओ

उत्तर प्रदेशाच्या राजकारणात शिवसेनेची एंन्ट्री, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन, पहा व्हिडिओ

आयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौ-याचा किती फायदा पक्षाला होतो ते येणारा काळच ठरवेल. मात्र माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. तसंच उत्तर प्रदेशाच्या राजकारणात चंचुप्रवेशही करण्याची तयारी पक्षानं केली आहे. त्याचा भाग म्हणून आयोध्येत शिवसेनेच्या शाखेचं उद्धाटन युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेना सद्सय नोंदणी अभियानाची सुरुवातही आदित्य यांच्या हस्ते करण्यात आली.


दरम्यान आज रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील पंचवटी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी यात्रा यशस्वी केल्याबद्दल आयोध्यावासियांचे आभार मानले. या दौ-यामागे कुठलाही छुपा अजेंडा नव्हता. या सरकारचे कार्यकाळातले शेवटचे अधिवेशन आहे. त्यामध्ये राम मंदिराविषयी अध्यादेश आणावा शिवसेना त्याला पाठिंबा देईल असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. हिंदुंच्या भावनांशी खेळू नका, मंदिर बनवलं नाही तर सरकार बनणार नाही असा इशारा त्यांनी मोदी सरकारला दिला.

COMMENTS