मुंबई – दि मुंबई डिस्ट्रिक्ट को ऑप हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत आता शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.काल दादर येथील मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते पॅनेलच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, उपस्थित होते.
दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेलचे 21 उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये आदियोदातो कार्मो मोन्टेरो, सुहास बने, ऍड प्रशांत देशमुख, संजय ढोलम, नगरसेवक संजय घाडी, प्रियांका घाणेकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, किरनराज जैन,प्रशांत कदम, कमलाकर नाईक, सचिन पाटील, विठ्ठल पवार, उन्मेश रावते,आमदार सुनिल राऊत, संदीप सावंत, अनिल सावंत, परमेश्वर थोरात,नामदेव गवंडी, मनोज संखे, सुनीता गोडबोले, व दिपा पाटील यांचा समावेश आहे.
रविवार 30 सप्टेंबर रोजी राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणाऱ्या या मतदानात सभासदांनी विमान निशाणीवर शिक्का मारून शिवप्रेरणा पॅनेलच्या बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार विभागावर प्रचार सुरू झाला असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वचननाम्यातील आश्वासने
गृहनिर्माण संस्थांचा कारभार अधिक सुलभ व पारदर्शी होण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणार.
आज अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यासाठी शासन व महापालिकेकडे पाठपुरावा करणार.
मानीव अभिहस्तांतर मिळवण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील राहून यासाठी माफी योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.
मुंबईतील 500 फुटांच्या सदनिकाचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत शिवसेनेने प्रस्तावित केले आहे त्याचा पाठपुरावा, घनकचरा व्यवस्थापनासाठी संस्थांमध्ये कार्यशाळा, प्रशिक्षण देणार.
फेडरेशनची पूर्व पश्चिम उपनगरात कार्यालये सुरू करणार.
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींना स्वयं पुनर्विकासासाठी प्रोत्साहित करणार आदी आश्वासने पॅनेलच्या वचननाम्यात देण्यात आली आहेत.
COMMENTS