मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबत धोरणनिश्चिती करण्यात आली असल्याची माहिती आहे. सोनिया गांधी यांची सध्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठक सुरु असून या बैठकीनंतर काँग्रेसची भूमिका जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आता सोनिया गांधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात सरकार स्थापन होणार की नाही, हे सोनिया गांधी काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास सोनिया तयार नसल्याचं बोललं जात होतं. परंतु सोनिया गांधी यांनी अखेर शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
COMMENTS