मुंबई – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांनी पाठिंबा दर्शवला होता. परंतु शिवसेनेनं याबाबत कोणतीही भूमिका व्यक्त केली नसल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. परंतु आज अखेर शिवसेना सरकारसोबत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेना सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टीडीपीच्या प्रस्तावाला शिवसेनेने महत्त्व देऊ नये असं शिवेसनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदार रवी गायकवाड वाद प्रकरणी टीडीपीचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे टीडीपीला पाठिंबा देऊ नये असं शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना सरकारला पाठिंबा देणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS