शिवसेनेला जोरदार धक्का, हजारो कार्यकर्त्यांसह तालुकाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश!

शिवसेनेला जोरदार धक्का, हजारो कार्यकर्त्यांसह तालुकाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश!

अहमदनगर – आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. पारनेर मतदारसंघातील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लंके यांनी  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तसेच पारनेर येथे होणा-या जाहीर सभेत मी व माझ्या तालुक्यातील ५० ते ६० हजार कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना न्लेश लंके यानी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.  मी शिवसेनेचे २० वर्षापासून एकनिष्ठ व १५ वर्ष तालुकाध्यक्ष, अडीच वर्ष पंचायत समिती उपसभापती, नियोजन समितीवर काम केले आहे. तसेच पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत.

पक्ष वाढीस कायम काम केले तरीही माझ्यावर अन्याय करून मला बढतर्फ केले असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे. पक्षातील श्रेयवादाचा कलह पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत गेला असता हलक्या कानाच्या पक्षप्रमूखांनी मला पक्षातून काढून टाकले. त्यामुळे मी शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटून औटी यांना शह देण्याचा विडा उचलला असल्याचंहू लंके यांनी म्हटलं आहे.

COMMENTS