संपर्कप्रमुख संपर्कच करेनात, मंत्रिपदसाठी अडून बसल्याची चर्चा !

संपर्कप्रमुख संपर्कच करेनात, मंत्रिपदसाठी अडून बसल्याची चर्चा !

उस्मनाबाद – परंडा तालुक्यात जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून चर्चेत आलेले शिवसेना नेते तानाजी सावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू बनले. त्यानंतर लगेच एप्रिल 2017 मध्ये ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडूण आले. आमदार झाल्यानंतर शिवसेना उपनेते तसेच उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांना पद मिळाले. या पदाचा सत्कार स्वीकारण्यासाठी आमदार सावंत जिल्हाभर फिरले. मात्र त्यानंतर एखादा दुसरा छोटा कार्यक्रम सोडता संपर्क प्रमुखांचा जिल्ह्यात संपर्कच बंद झाल्यासारखं चित्र आहे.

आमदार झाल्यानंतर परंडा येथे संपर्कप्रमुखांच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमानंतर सावंत कोणत्याही जाहीर कार्यक्रमात आले नाहीत. छोट्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावली असली तरी कार्यकरत्यांना बळ देणारा कार्यक्रम झालेला नाही. पक्ष वाढीसाठी बळ देणे, संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, अशा गोष्टी होतील अशी अपेक्षा जिल्ह्यातील शिवसैनिकांची होती.

आजपर्यंत केवळ निवडणूक आली की संपर्कप्रमुख कार्यकर्त्यांना तोंड दाखवत असे. आमदार सावंत यांच्याकडून मात्र शिवसैनिकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. आमदार सावंत यांनी उस्मानाबाद शहरानजीक असलेल्या हातलाई मंगल कार्यालयातल्या कार्यक्रमात तळागाळातल्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. याकडे सध्या दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

प्रा. सावंत हे एक उद्योजक आहेत. त्यांचा बाणेदार स्वभाव आहे. पैशापेक्षा माणूस महत्वाचा म्हणून ते काम करतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे हातलाईमधील कार्यक्रमात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळाले होते. परंतु, आता तब्बल सात महिन्यानंतरही प्रा. आमदार सावंत जिल्ह्यात फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. आमदार सावंत मंत्रीपदासाठी अडून बसल्याची चर्चा आहे. मंत्रीपद मिळाल्याशिवाय जिल्ह्यात संपर्क करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतल्याचीची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे हेही संपर्कप्रमुख इतर संपर्कप्रमुखांसाऱखेच आहेत अशी आता जिल्ह्य्तील शिवसैनिकांची भावना झाली आहे.

COMMENTS