नवी दिल्ली – राज्यात शिवमहाआघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतु काँग्रेसनं याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे त्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान दिल्लीत बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात आज बैठक झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS