मुंबई – मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेने आता गुजराती मतदारांना साद घातली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती समाज असून हा नेहमी भाजपच्या पाठीशी राहिला आहे. पंरतु या मतदाराला आपल्या बाजूला वळविण्यासाठी शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं अशी टॅगलाईन चालून मतदारांना आकर्षित करण्याची मोहित हाती घेतली आहे.
शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून मुंबई महापालिका ओळखले जाते. पण भाजपाने हा बालेकिल्ला काबीज करण्याची रणनिती आखली असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली. मुंबई भाजपचे अध्यक्षपद पदी मंगलप्रभात लोढा यांना बसवले आहे. तसेच मुंबईची प्रभारी म्हणून अतुल भातखळकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यांनी स्वबळाचा नारा देऊन आतापासूनच महापालिकेसाठी रणशिंग फुंगकले आहे.
भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने त्यादृष्टीने आता शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
१० जानेवारीला जोगेश्वरीत हा मेळावा पार पडणार आहे. यासाठी मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. या मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेशदेखील पार पडतील असं सांगितलं जात आहे.
COMMENTS