मुंबई – महापालिकेतील प्रभाग 173 सायनमध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर शिवसेनेनं आपला गड राखला आहे. परंतु भाजपनं साथ देऊनही शिवसेनेचं मताधिक्य मात्र घटलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. या पोटनिवडणुकीत विजयी रामदास कांबळे यांना एकूण 6 हजार 616 मतं मिळाली असून काँग्रेसच्या सुनील शेट्ये यांना 5 हजार 771 मतं मिळाली आहेत. या मताधिक्यावरुन शिवसेनेच्या रामदास कांबळे यांचा फक्त 849 मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपनं साथ दिली असली तरी काँग्रेसनं मात्र जोरदार टक्कर दिली असल्याचं पहावयास मिळालं आहे. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असून फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार दिवंगत प्रल्हाद ठोंबरे यांचा तीन हजारांच्या फरकाने विजयी झाला होता. तर काँग्रेस चौथ्या स्थानावर होती. यावरुन काल घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची मतं फोडण्यात काँग्रेसला यश आलं असल्याचं दिसून येत आहे.
शिवसेनेच्या विरोधात शिवैनिक
दरम्यान महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 चे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसैनिक असलेल्या सुनील शेट्ये यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाली आहेत परंतु काँग्रेसा विजय मात्र मिळवता आला नाही
भाजपचा पाठिंबा
प्रभाग 21 मधील भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक 173 मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला होता.
COMMENTS