मुंबई – शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनवल्याने नाराज
झालेल्या जवळपास 400 शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. हे शिवसैनिक धारावीतील असून केवळ सत्तेत यावे म्हणून शिवसेना महाविकासआघाडीत सहभागी झाल्याचा आरोपही भाजपत प्रवेश केलेल्या शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेने भ्रष्ट आणि हिंदू विरोधी असलेल्या पक्षांशी हात मिळवणी करणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेतल्यासारखे आपल्याला वाटत असल्याचे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले रमेश नाडार यांनी म्हटले आहे.
दरम्यान आपण गेल्या ७ वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या विरोधात लढत आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी घराघरात जात लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता त्या लोकांच्या नजरेला नजर आपण कशी देऊ शकतो, असही नाडार यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना महाविकासआघाडीत सहभागी झाल्यामुळे असंख्य शिवसैनिक नाराज असल्याचही त्यांनी म्हटलं आहेे.
COMMENTS