बंगरुळू- पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्ये नंतर आणखी 10 लोक मरेकऱ्यांच्या हिटलिस्ट वर होती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या हिटलिस्टमध्ये माजी मंत्री एम.बी.पाटील आणि विनय कुलकर्णी यांची देखील नावे सापडल्याची माहिती आहे. लिंगायत स्वातंत्र्य धर्माची मान्यता मिळावी यासाठी या दोन मंत्र्यांनी मोठी धडपड केली होती. लिंगायत धर्म हा वेगळा झाल्यास हिंदू धर्मात फूट पडेल. म्हणून हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्या मुळे या मंत्र्यांवर मारेकऱ्यांचा राग होता.
गौरी लंकेश हत्ये प्रकरणात एक वर्षानंतर कर्नाटक पोलिसांना यश आले असून त्यांनी गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या परशुराम वाघमारे याला नुकतंच अटक केलंं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, आणि कलबुर्गी , गौरी लंकेश यांची हत्या एकाच बंदुकीने केली आहे. तोच धागा धरत पोलीस बाकीच्या हत्येची चौकशी करीत आहे. त्यांनतर अश्या दोन माजी मंत्र्यांची नावे समोर येणे म्हणजे धक्कादायकच!
COMMENTS