मुख्यमंत्र्यांवर भिरकावला बूट !

मुख्यमंत्र्यांवर भिरकावला बूट !

बारगढ – मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना यादरम्यान एका तरुणानं त्यांच्यावर बूट भिरकावला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडीशातील बारगढ याठिकाणी ही घटना घडली असून ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे सर्वेसर्वा नवीन पटनायक यांच्यावर बूट भिरकावण्यात आला आहे. बारगढच्या बरपाली मतदारसंघातील कुंभरी गावात ही घटना घडली असून ते रिता साहू या त्यांच्या पक्षातील उमेदवाराच्या प्रचारार्थ त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांचं भाषण सुरु होताच एका संतप्त तरुणानं आपल्या पायातील बूट काढून त्यांच्या अंगावर भिरकावला असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/965967855631130625

 

दरम्यान मंगळवारी ही घटना घडली असून या व्हिडीओमध्ये पटनायक बोलत असताना अचानक त्यांच्या अंगावर समोर बसलेल्या एका संतप्त तरुणानं बूट फेकला. त्यावेळी पटनायक यांनी आपला बचाव करत त्याठिकाणाहून पळ काढला असल्याचं व्हिडीओमध्ये पहावयास मिळालं आहे. तसेच आरोपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कार्तिक मेहेर असं त्याचं नाव आहे. दरम्यान भाजपनंच ही घटना घडविली असल्याचा आरोप बीजेडीचे आमदार देबेश आचार्य यांनी केला आहे.

COMMENTS